तपस्वी श्रीराम महाराजांचे देहावसान
By Admin | Updated: May 28, 2014 23:36 IST2014-05-28T23:07:41+5:302014-05-28T23:36:44+5:30
महान तपस्वी श्री संत काशीनाथबाबा यांचे लहान बंधू तपस्वी श्रीराम महाराज यांनी २७ मे रोजी सकाळी ७.३९ वाजता वैकुंठात विलीन झाले.

तपस्वी श्रीराम महाराजांचे देहावसान
वाईगौळ : महान तपस्वी श्री संत काशीनाथबाबा यांचे लहान बंधू तपस्वी श्रीराम महाराज यांनी २७ मे रोजी सकाळी ७.३९ वाजता वैकुंठात विलीन झाले. महान तपस्वी श्रीराम महाराज यांनी ३३ वर्ष अखंड निराहार तपश्चर्या केली. त्यांच्या पश्चात त्यांच्या गादीवर हभप दीपक महाराज यांचा अभिषेक विधी त्यांच्या उपस्थितीत पार पडल्यानंतर हजारो भाविकांच्या समक्ष महाराजांना समाधी देण्यात आली. यावेळी भाविकांना आपला शोक अनावर झाला होता. पितामह भिष्माप्रमाणे हस्तिनापूर शाबित झाल्यानंतर देहत्याग केला त्याचप्रमाणे देशाचे शासन स्थिर झाले आहे, असे भाविकांना सांगून त्यांनी आपले देहावसान केले. ९ जून २0१३ रोजी एकादशीचा जागर व कीर्तन व द्वादशीला काल्याचे कीर्तन हभप मधुकर महाराज खोडे करतील. यावेळी संतवर्ग व भाविकांचा मेळा मोठय़ा प्रमाणात जमला होता. समाधीप्रसंगी विवेक कंठे शास्त्रीची यांनी संहिता वाचन करून समाधीचा विधी पूर्ण केला.