शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
4
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
5
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
6
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
7
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
8
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
9
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
10
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
11
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
12
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
13
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
14
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
15
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
16
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
17
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
18
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
19
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
20
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...

अकोला जिल्ह्यात हिवतापाचा उतरता आलेख;  चार वर्षांत रुग्ण संख्येत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 13:24 IST

जिल्ह्यात गत चार वर्षांत हिवताच्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सातत्याने घट होत असल्याची नोंद हिवताप विभागाकडे आहे.

ठळक मुद्देवर्ष २०१४ मध्ये हिवतापाचे १९६ रुग्ण आढळून आले होते. २०१५ मध्ये १७९, २०१६ मध्ये ९२ रुग्ण, तर २०१७ मध्ये केवळ ५३ रुग्णांना हिवतापाची बाधा झाल्याची नोंद आहे.यावर्षी मार्च अखेरपर्यंत हिवतापाचे केवळ आठ रुग्ण समोर आले आहेत.

- अतुल जयस्वालअकोला: मनुष्याची प्राणहानी करणाऱ्या आजारांमध्ये हिवतापाचा (मलेरिया) क्रमांक बºयाच वरचा असून, दरवर्षी जगात या आजाराने अनेकांचा मृत्यू होतो. आरोग्याच्या दृष्टीने हिवताप ही एक महत्त्वाची समस्या असून, या रोगाच्या उच्चाटनासाठी २०३० पर्यंत हिवतापमुक्तीचे धोरण ठरविण्यात आले असून, यामध्ये अकोला जिल्ह्याने आघाडी घेतल्याचे गत चार वर्षांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. जिल्ह्यात गत चार वर्षांत हिवताच्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सातत्याने घट होत असल्याची नोंद हिवताप विभागाकडे आहे.हिवतापाबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने दरवर्षी २५ एप्रिल हा जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षीचे घोषवाक्य ‘तयारी हिवतापास हरविण्याची’, हे आहे. ‘अ‍ॅनाफिलिस’ या डासांच्या मादीपासून हिवतापाचा प्रसार होतो. मलेरियाचे चार प्रकार आहेत. यामध्ये प्लास्मोडियम व्हायवॅक्स, प्लास्मोडियम फॅल्सिपेरम, प्लास्मोडियम मलेरिया व प्लास्मोडियम ओव्हेल यांचा समावेश आहे.यापैकी प्लास्मोडियम फॅल्सिपॅरम या आजारात वेळीच उपचार घेतला नाही, तर मृत्यू होण्याची शक्यता असते. भारतात प्लास्मोडियम व्हायवॅक्स, प्लास्मोडियम फॅल्सिपेरम या प्रकारचे जंतू आढळतात. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा हिवताप कार्यालयामार्फत हिवतापाबाबत जनजागृती करण्यात येऊन रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येतो. आरोग्य विभागामार्फत घरोघरी सर्वेक्षण करून तापाच्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांचे रक्त नमुने घेतले जातात. हिवताप निष्पन्न झालेल्या रुग्णांना क्लोरोक्विनच्या गोळ्या देऊन उपचार केले जातात. तसेच डासांची उत्पत्ती होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजले जातात. वर्ष २०१४ मध्ये हिवतापाचे १९६ रुग्ण आढळून आले होते, त्यानंतर २०१५ मध्ये १७९, २०१६ मध्ये ९२ रुग्ण, तर २०१७ मध्ये केवळ ५३ रुग्णांना हिवतापाची बाधा झाल्याची नोंद आहे. यावर्षी मार्च अखेरपर्यंत हिवतापाचे केवळ आठ रुग्ण समोर आले आहेत. रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याने जिल्हा लवकरच हिवतापमुक्त घोषित होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे आशादायी चित्र आहे.पाचही जिल्ह्यांत आशादायी चित्रआरोग्यसेवा (हिवताप) अकोला मंडळातील अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशिम या पाच जिल्ह्यांमध्ये हिवतापावर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य विभाग यशस्वी ठरल्याचे चित्र आहे. २०१७ मध्ये पाचही जिल्ह्यांमधून २० लाख ५५ हजार ४६ रक्त नमुने गोळा करण्यात आले. त्यापैकी २८५ जणांना मलेरियाची लागण झाल्याचे आढळले. यावर्षी रुग्णांची संख्या लक्षणीय घटून ती केवळ ३६ वर आली.गत चार वर्षांत हिवताप निर्मूलनात बºयाच अंशी यश आले आहे. स्वच्छतेकडे लक्ष दिल्यास कीटकजन्य आजारांवर नियंत्रण मिळविता येते. हिवतापाला आळा घालण्यासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा, डासांच्या चाव्यापासून बचावासाठी मच्छरदाणीचा वापर करावा.

- डॉ. अभिनव भुते, सहायक संचालक, आरोग्यसेवा, (हि.) अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य