शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

उपायुक्तांनी आमची बाजू ऐकलीच नाही!

By admin | Updated: December 31, 2014 00:58 IST

अकोल्यातील अतिक्रमण हटाव मोहिम; व्यापा-यांनी व्यक्त केली खंत.

अकोला : शहरात फोफावणार्‍या अतिक्रमणाची जाणीव असल्यानेच विदर्भ चेंबर ऑफ कॉर्मसने या बाबीला कधीही पाठिंबा दिला नाही. कायद्याचे पालन करूनच व्यावसायिकांनी व्यवसाय उभारले आहेत, परंतु खुले नाट्यगृहलगतच्या जागेवरील १२ दुकानांसंदर्भात उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी आमची बाजू ऐकूनच घेतली नाही. रात्री कारवाई करून दुकाने अक्षरश: नेस्तनाबूत केली. यामुळे प्रशासनाच्या विरोधात न्यायालयीन लढाई लढण्यासोबतच सर्व व्यापारी संघटनांशी चर्चा करून पुढील दिशा स्पष्ट करणार असल्याची भूमिका मंगळवारी विदर्भ चेंबर ऑफ कॉर्मसच्या पदाधिकार्‍यांनी आयोजित पत्रकार परिषदेत मांडली.खुले नाट्यगृहालगतची जागा तत्कालीन नगरपालिका प्रशासनाने १९८0 मध्ये भाडेतत्त्वावर दुकाने उभारण्यासाठी दिली होती. या दुकानांपासून मनपाला महसूल दिला जात होता. स्थायी समिती सभेने या दुकानांचा भाडेपट्टा २0२१ पर्यंत मंजूर केला. जागेचा करार संपल्यामुळे तो वाढवून देण्यासंदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला; परंतु मनपा प्रशासनाने व्यावसायिकांची बाजू न ऐकून घेता, एकतर्फी कारवाई करीत सर्व दुकाने भुईसपाट केल्याची माहिती चेंबरचे माजी अध्यक्ष अशोक डालमिया यांनी दिली. दुकानांचे अतिक्रमण नसतानासुद्धा त्याला अतिक्रमणाचा रंग देण्यात आला. प्रशासनाने दुकाने खाली करण्याचे फर्मान सोडल्यानंतर २७ डिसेंबर रोजी आम्ही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांची भेट घेऊन सविस्तर बाजू मांडली होती. त्यावर पालकमंत्र्यांनी उपायुक्त चिंचोलीकर यांना सूचना देऊन कारवाई न करण्याचे निर्देश दिले तसेच आम्हालासुद्धा दुकानात पूर्ववत साहित्य ठेवण्याचे सूचित केले होते. पालकमंत्र्यांच्या आश्‍वासनामुळे दुकानांमध्ये साहित्य ठेवले; परंतु २८ डिसेंबर रोजी पालकमंत्री डॉ. पाटील यांचा नागरी सत्कार संपताच, मनपाने रात्री अचानक दुकाने जमीनदोस्त केल्याने आम्हाला प्रचंड मानसिक धक्का बसल्याचे डालमिया यांनी यावेळी सांगितले. पालकमंत्र्यांचे निर्देश उपायुक्तांनी कसे जुमानले यावर संभ्रम असल्याचे अशोक डालमिया यांनी यावेळी सांगितले.