तडीपार केलेले आराेपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:17 IST2021-02-07T04:17:35+5:302021-02-07T04:17:35+5:30

अकाेला : जिल्ह्यातून दाेन वर्षांसाठी तडीपार केलेल्या एका आराेपीस शहर पाेलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या विशेष पथकाने अटक केली. ...

Deported RAP arrested | तडीपार केलेले आराेपी अटकेत

तडीपार केलेले आराेपी अटकेत

अकाेला : जिल्ह्यातून दाेन वर्षांसाठी तडीपार केलेल्या एका आराेपीस शहर पाेलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या विशेष पथकाने अटक केली. ५ फेब्रुवारी राेजी राबिवण्यात आलेल्या काेम्बिंग ऑपरेशन दरम्यान ही कारवाई करण्यात आली. जुने शहरातील हरिहर पेठेतील रहिवासी आकाश रामा निनोरे (वय २४) याला जिल्ह्यातून दाेन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. मात्र त्यानंतरही ताे शहरात राहत असल्याची माहिती शहर पाेलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या विशेष पथकाला मिळाली. या माहितीवरून त्यांच्या पथकाने सापळा रचून त्यास अटक केली. त्यानंतर आराेपीविरुद्ध जुने शहर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पाेलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या विशेष पथकाने केली.

Web Title: Deported RAP arrested