संत गजाननाच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान
By Admin | Updated: June 5, 2014 21:39 IST2014-06-05T21:39:04+5:302014-06-05T21:39:27+5:30
शेगाव येथून आज गुरूवार रोजी ब्रम्हमुहूर्तावर श्री गजाननाची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली.

संत गजाननाच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान
शेगाव : आज गुरूवार ज्येष्ठ शु.७ ला ब्रम्हमुहूर्तावर श्री गजाननाची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील याच्या हस्ते संत गजाननाच्या रजत मुखवट्याचे विधीवत पूजन करण्यात आले.
शेगाव येथून नागझरी रस्त्याने पालखीचे प्रस्थान झाले. पालखीसमवेत नागझरी रोड पावेतो संस्थानचे कार्यकारी विश्वस्त नीळकंठदादा पाटील, नारायणराव पाटील, किशोर टांक, विश्वेश्वर त्रिकाळ, डॉ.रमेशचंद्र डांगरा, अशोकराव देशमुख, पंकज शितुत, चंदुलाल अग्रवाल, मधुकर घाटोळ, श्री गजानन शिक्षण संस्थेचे सचिव, शरद शिंदे, आदींसह भक्तगण सहभागी झाले होते.
संत गजानन महाराजांची दिंडी घेऊन शेगावपासून निघालेले भाविक सुमारे ५३0 किलोमीटरचा शिस्तबद्ध प्रवास करून आषाढी एकादशीला पंढरपूर येथे हजेरी लावतील . दिंडीचे हे ४७ वे वर्ष आहे. ५ जून रोजी शेगावहून निघालेली ही दिंडी ३३ दिवसांचा पायी प्रवास करून ७ जुलै रोजी पंढरपूरला पोहोचेल. आषाढी एकादशीच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर या पालखीची पावले पुन्हा गजानन महाराजांच्या शेगावकडे वळणार आहेत . २ ऑगस्ट रोजी ही दिंडी परत शेगावला पोहोचेल.
**चोख बंदोबस्तात पालखी रवाना
पालखीसह दंगाकाबू पथक तसेच वाहतूक शाखा आणि पोलिस कर्मचार्यांचा चोख बाब्दोबास्त लावण्यात आला होता. तीन वर्षांपूर्वी जालना जिल्हयात पालखीला भीषण अपघात घडला होता. यामुळे तेंव्हा पासून पोलिस विभाग दक्ष झालेला असून पालखी मार्गावर चोख बदोबस्त ठेवण्यात येत आहे.