दिवाळीत अकोला जिल्ह्यात पाच कोटींचा धुव्वा

By Admin | Updated: October 25, 2014 01:08 IST2014-10-25T00:54:05+5:302014-10-25T01:08:46+5:30

फटाक्यांची आतषबाजी जोरात; फटाक्यांमुळे पक्ष्यांच्या जीविताला धोका.

In Deolali, Akola district is worth five crores | दिवाळीत अकोला जिल्ह्यात पाच कोटींचा धुव्वा

दिवाळीत अकोला जिल्ह्यात पाच कोटींचा धुव्वा

अकोला : दरवर्षीप्रमाणे दिवाळी सण संपूर्ण देशात मोठय़ा हर्षोल्हासात व आतषबाजीने साजरा करण्यात येत आहे. दिवाळीतील मुख्य लक्ष्मीपूजनाचा आनंदोत्सव साजरा करताना यंदा जिल्ह्यात सुमारे पाच कोटी रुपयांचे फटाके फोडण्यात आले.
शहरासह जिल्ह्यातील गावागावांत फटाक्यांची दुकाने सजली होती. शहरातील अकोला क्रिकेट क्लबच्या मैदानावर फटाका असोसिएशनच्या वतीने ५२ दुकाने लावण्यात आली होती. यापैकी प्रत्येक दुकानात अंदाजे दोन लाख असे एक कोटी व शहरातील अन्य भागात लावलेल्या दुकानांमध्ये एक कोटी रुपयांच्या फटाक्यांची दिवाळीच्या तीन दिवसांत विक्री झाली. अजूनही काही दुकाने सजलेली असून, पुढील दोन दिवसांत फटाक्यांची जोरदार विक्री होईल. तालुकास्तरावरील पाच शहरे व गावागावांत फटाक्यांची मोठय़ा प्रमाणात विक्री झाली आहे. शहरातील होलसेल फटाका विक्रेत्यांच्या माहितीनुसार, यावर्षी जिल्ह्यात पाच कोटी रुपयांच्या फटाक्यांची विक्री झाली आहे. या फटाक्यांमुळे पक्ष्यांच्या जीविताला धोका निर्माण होत असून, यामुळे ध्वनी व वायू प्रदूषणही मोठय़ा प्रमाणात होते. फटाक्यांचा कर्कश्श आवाज व धुरामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होतो.

Web Title: In Deolali, Akola district is worth five crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.