परवाने नूतनीकरणास नकार

By Admin | Updated: May 9, 2014 00:35 IST2014-05-09T00:17:55+5:302014-05-09T00:35:53+5:30

आज ८ मे रोजी हमाल-मापारींनी अचानकपणे कामबंद आंदोलन पुकारल्याने येथील कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहिली. तर अचानक झालेल्या या बंदमुळे माहितीअभावी शेतकर्‍यांना त्रास सहन करावा लागला.

Denial of licenses renewal | परवाने नूतनीकरणास नकार

परवाने नूतनीकरणास नकार

 
खामगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मापारींचे परवाने नूतनीकरण करण्यास बाजार समितीने नकार दिल्याच्या कारणावरून आज ८ मे रोजी हमाल-मापारींनी अचानकपणे कामबंद आंदोलन पुकारल्याने येथील कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहिली. तर अचानक झालेल्या या बंदमुळे माहितीअभावी शेतकर्‍यांना त्रास सहन करावा लागला.
खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही मापारींना काटेपट्टय़ा समितीकडे सादर करणे बंधनकारक आहे; मात्र अनेक मापारींनी काटेपट्टय़ा सादर केल्या नव्हत्या. त्यामुळे बाजार समितीच्या झालेल्या अंकेक्षणात याबाबत मेळ जुळत नसल्याने त्रुटी काढून यामुळे शासनाचे तसेच कृउबासचे नुकसान होत होते.
त्यामुळे बाजार समितीच्यावतीने मापारींना काटेपट्टय़ा सादर करण्याबाबत सूचित करण्यात आले; मात्र तरीही काटेपट्टय़ा सादर केल्या नव्हत्या. त्यामुळे बाजार समितीने मापारी अ. रहेमान शे. रहेमान, रवी अशोक मोरे, महादेव रामचंद्र तायडे, सै. रिजवान सै. अमीर, अनिल दशरथ जाधव, अंबादास शंकर मुळे, गजानन दामू इंगळे, भगवान बळीराम सहस्त्रबुद्धे, हसनशहा तालेबशहा, देवानंद सहदेव हेलोडे, सुरेश महादेव सिरसाट, संतोष बजरंग गायकवाड, संभाजी विठ्ठल तासतोडे, सुगदेव नामदेव हेलोडे, नामदेव वामन हिवराळे, भारत उत्तम टकले, प्रल्हाद खंडूजी म्हारनारे, वामन मारोती राऊत, तसलीमखा इस्माईलखा, शेख जाकिर शेख नासीर, धम्मपाल उत्तम इंगळे, भारत मसाराम पहुरकार, शाम दगडू सरदार, अनिल लहानू हेलोडे, गोकुल विठ्ठल माटकर, संतोष जनार्दन जाधव, ईश्‍वर सुगदेव तायडे, बापू शंकरराव खोसे, राहुल रामकृष्ण सावंग, जगदेव दगडू हेलोडे, भाऊराव सापुर्डा हेलोडे, शे. अहमद शे. सत्तार, दिनेश रमेश हेलोडे, शाम लक्ष्मण हेलोडे, गणेश किसन चुनेकर अशा एकूण ३७ मापारींना २६ मार्च रोजी कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती; मात्र तरीही काटेपट्टय़ा सादर न झाल्याने कृउबासने काटेपट्टय़ा सादर न करणार्‍या एकूण ३७ मापारींचे परवाने एका आदेशान्वये रद्द केले. त्यामुळे या कारवाईच्या निषेधार्थ मापारींचे परवाने नूतनीकरण करण्यास २४ एप्रिल रोजी नकार दिला होता. त्यामुळे आज ८ मे रोजी हमाल-मापारींनी अचानकपणे कामबंद आंदोलन केले. यामुळे शेतकर्‍यांची मात्र गैरसोय झाली. 

Web Title: Denial of licenses renewal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.