डेंग्यू चाचणीसाठी पश्चिम व-हाडात फक्त दोन शासकीय केंद्र
By Admin | Updated: November 29, 2014 22:26 IST2014-11-29T22:26:23+5:302014-11-29T22:26:23+5:30
खासगी पॅथॉलॉजी लॅबची मनमानी

डेंग्यू चाचणीसाठी पश्चिम व-हाडात फक्त दोन शासकीय केंद्र
ब्रम्हानंद जाधव/मेहकर (बुलडाणा)
संपूर्ण राज्यात डेंग्यू व मलेरिया या साथीच्या आजारांनी सर्वत्र थैमान घातले असताना, वर्हाडात केवळ दोनच शासकीय रुग्णालयांमध्ये डेंग्यू चाचणी होत असल्यामुळे, रूग्ण व त्यांचे कुटुंबीय त्रस्त झाले आहेत. दरम्यान, परिस्थितीचा लाभ उचलत, खासगी पॅथॉलॉजी लॅब चालकांकडून रुग्णांचे आर्थिक शोषण सुरू आहे.
राज्यात डेंग्यू व मलेरियाने चांगलेच हात-पाय पसरविले असून, यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत, डेंग्यूने २४ पेक्षा अधिक बळी घेतले आहेत. राज्यात डेंग्यूचे ३,५00 पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. सप्टेंबरच्या अखेरच्या दिवसांपासून डेंग्यूचा जोर जास्तच वाढला. डेंग्यूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने, रुग्णाला ताप आल्यास त्याची डेंग्यू चाचणी करणे गरजेचे झाले आहे. डेंग्यूची ही चाचणी शासकीय रुग्णालयांमार्फत मोफत केली जाते; परंतू, पश्चिम वर्हाडात डेंग्यूची चाचणी करण्याची सोय, केवळ अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न सवरेपचार इस्पितळ व वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालय या दोनच ठिकाणी उपलब्ध असल्याने, अनेक रुग्णांना परवडत नसूनही खासगी पॅथॉलॉजी लॅबमध्ये जावे लागत आहेत.
खासगी पॅथॉलॉजीमध्ये डेंग्यू चाचणीसाठी प्रचंड शुल्क आकारले जात आहेत. अनेक डॉक्टरांचे व खासगी लॅब चालकांचे साटेलोटे असल्याने, रुग्णांना डॉक्टरांनी सांगितलेल्या खासगी लॅबमध्येच रक्त तपासणीसाठी जावे लागते. पश्चिम वर्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशिम या तीनही जिल्ह्यांमधील शासकीय यंत्रणा डेंग्यू चाचणीसाठी कुचकामी ठरत आहे, तर दुसरीकडे रक्त तपासणीसाठी गल्लीबोळात खासगी लॅबही थाटल्या आहेत.
डेंग्यू तपासणीचे मनमानी दर
डेंग्यू चाचणीकरीता डेंग्यू ह्यएनएस-वनह्ण, ह्यडेंग्यू आयजीजीह्ण, ह्यडेंग्यू आयजीजीएमह्ण या तीन चाचण्या केल्या जातात. खासगी लॅबमध्ये या तिन्ही चाचण्यांच्या दरामध्ये समानता नाही. ह्यएनएस-वनह्णसाठी ७00 ते ८00 रुपये, ह्यआयजीजीह्णसाठी ६00 ते ७00 रुपये, तर ह्यआयजीजीएमह्णसाठी ५00 ते ६00 रुपये असे मनमानी दर आकारले जात आहेत.
डेंग्यू चाचणीसाठी शासकीय यंत्रणा कुचकामी
बुलडाणा जिल्ह्यातील रुग्णांची शासकीय यंत्रणेमार्फत डेंग्यू चाचणी करायची झाल्यास, रक्ताचे नमुने अकोला येथे पाठवावे लागतात, तर वाशिम जिल्ह्यात डेंग्यू चाचणी केवळ जिल्हा सामान्य रुग्णालयात होत असून, ग्रामीण रुग्णालयात जाणार्या रुग्णांच्या हातावर ह्यरेफरह्णचे पत्रच थोपविल्या जात आहे.