डेंग्यू, स्वाइन फ्लूचा विळखा; सर्वोपचार’सह खासगी रुग्णालये फुल्ल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 13:14 IST2018-09-30T13:12:38+5:302018-09-30T13:14:33+5:30

अकोला : वातावरणातील बदलाने कीटकजन्य व विषाणूजन्य आजारांनी डोके वर काढले असून, जिल्हाभरात डेंग्यू, चिकुनगुनिया, स्क्रब टायफस व स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहेत.

 Dengue, swine flu; patients in government and Private hospitals | डेंग्यू, स्वाइन फ्लूचा विळखा; सर्वोपचार’सह खासगी रुग्णालये फुल्ल 

डेंग्यू, स्वाइन फ्लूचा विळखा; सर्वोपचार’सह खासगी रुग्णालये फुल्ल 

ठळक मुद्देआतापर्यंत डेंग्यूचे ३०, स्वाइन फ्लूचे सहा, स्क्रब टायफसचे १२ कन्फर्म रुग्ण आढळून आले आहेत.गत काही दिवसांपासून वातावरणात झालेले बदलही आजारांच्या पथ्यावर पडत आहेत. चिकुनगुनियानेही डोके वर काढले असून, जिल्ह्यात आतापर्यंत २० रुग्ण आढळून आल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे.

अकोला : वातावरणातील बदलाने कीटकजन्य व विषाणूजन्य आजारांनी डोके वर काढले असून, जिल्हाभरात डेंग्यू, चिकुनगुनिया, स्क्रब टायफस व स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहेत. घराघरांमध्ये ‘व्हायरल’चे रुग्ण आढळून येत असून, सर्वोपचार रुग्णालयासह शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी दिसून येत आहे. आतापर्यंत डेंग्यूचे ३०, स्वाइन फ्लूचे सहा, स्क्रब टायफसचे १२ कन्फर्म रुग्ण आढळून आले आहेत.
पावसाळ्यात साचलेले पाणी, वातावरणातील आर्द्रता यामुळे आजार पसरविणाऱ्या कीटक व विषाणूंना पोषक वातावरण मिळत असल्याने रुग्णांची संख्या वाढली आहे. गत काही दिवसांपासून वातावरणात झालेले बदलही आजारांच्या पथ्यावर पडत आहेत. एडीस डासांपासून होणारा डेंग्यू, चिगर माइट्सच्या चावल्याने होणारा स्क्रब टायफस, तसेच एच १ एन १ या विषाणूंपासून होणाºया स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढला आहे. थंडीवाजून ताप, मळमळ, डोकेदुखी, प्लेटलेट कमी होणे, अशी लक्षणे असलेले रुग्ण घराघरांमध्ये आढळून येत आहेत.

सर्वोपचारमध्ये ‘स्वाइन फ्लू’ने महिलेचा मृत्यू
एच १ एन १ या विषाणूपासून होणारा स्वाइन फ्लू हा अत्यंत संसर्गजन्य आजार असून, हवेवाटे याचा झपाट्याने प्रसार होतो. येथील सर्वोपचार रुग्णालयात स्वाइन फ्लूची लागण झालेले सहा रुग्ण दाखल असून, शुक्रवारी त्यापैकी एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांकडून मिळाली आहे. यापूर्वी गायगाव येथील एका रुग्णाचाही स्वाइन फ्लूने मृत्यू झाला होता.

सोनोरी येथे चिकुनगुनियाचा उद्रेक
इतर आजारांसोबतच चिकुनगुनियानेही डोके वर काढले असून, जिल्ह्यात आतापर्यंत २० रुग्ण आढळून आल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील सोनोरी-बपोरी येथे अलीकडेच अज्ञात तापाने धुमाकूळ घातल्यानंतर आरोग्य विभागाकडून करण्यात आलेल्या तपासणीत त्या ठिकाणी चिकुनगुनियाचे तीन तर डेंग्यूचे दोन कन्फर्म रुग्ण आढळून आले. त्यामुळे आरोग्य विभागाने या गावात चिकुनगुनियाचा उद्रेक घोषित करून उपाययोजना केल्या आहेत.

जलजन्य आजारही वाढले!
पावसाळ्यात जलस्रोत दूषित झाल्याने पाण्यापासून होणाºया आजारांमध्येही वाढ झाली आहे. अतिसार, गॅस्ट्रोची लागण झालेले रुग्णही शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

 

Web Title:  Dengue, swine flu; patients in government and Private hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.