बुलडाण्यात आढळला डेंग्युचा रुग्ण

By Admin | Updated: June 23, 2016 22:45 IST2016-06-23T22:45:49+5:302016-06-23T22:45:49+5:30

शुद्ध पाणीपुरवठय़ाकडे ग्रामपंचायतने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांची मागणी.

Dengue sufferers found in bulldog | बुलडाण्यात आढळला डेंग्युचा रुग्ण

बुलडाण्यात आढळला डेंग्युचा रुग्ण

धामणगाव बढे(जि. बुलडाणा): येथील ८ वर्षीय मुलाला डेंग्युची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. येथील प्रेम शांताराम चौधरी यास ताप आल्याने बुलडाणा येथे खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यानंतर विविध चाचण्या केल्यानंतर सदरहु मुलास डेंग्युची लागण झाल्याचे वैद्यकिय अहवालात निष्पन्न झाले. प्रेमच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. गावामध्ये शुद्ध पाणीपुरवठय़ाकडे ग्रामपंचायतने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थ करीत असून आरोग्य विभागाने याकडे गांभिर्याने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

Web Title: Dengue sufferers found in bulldog