शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

अकोला जिल्ह्यात डेंग्यूचे सात रुग्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 2:30 PM

काही दिवसांपासून दवाखाने, रुग्णालयांत साथरोगसदृश तापीच्या रुग्णांची गर्दी वाढली असून, यात सात रुग्ण डेंग्यूचे, तर पाच रुग्ण मलेरियाचे आढळून आले आहेत.

ठळक मुद्देआलेगाव, पिंजर, धाबा, महान, पळसो बढे या गावांमध्ये डेंग्यूचे सात रुग्ण आढळून आले आहेत. उरळ, हातरूण, पंचगव्हाण, पळसो बढे या गावांमध्ये मलेरियाचे पाच रुग्ण आढळून आले आहेत.रुग्णांची ही संख्या कमी असली, तरी धोका टळला नाही.

अकोला : बदलत्या वातावरणाचा फटका अकोलेकरांना बसायला सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसांपासून दवाखाने, रुग्णालयांत साथरोगसदृश तापीच्या रुग्णांची गर्दी वाढली असून, यात सात रुग्ण डेंग्यूचे, तर पाच रुग्ण मलेरियाचे आढळून आले आहेत.जिल्ह्यात साथरोगसदृश तापाची डोकेदुखी वाढली असून, डेंग्यू, चिकुन गुनियाचीही लक्षणे अनेक रुग्णांमध्ये दिसून येत आहेत. दवाखाने व रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. गत सहा महिन्यांत जिल्ह्यातील आलेगाव, पिंजर, धाबा, महान, पळसो बढे या गावांमध्ये जिल्ह्यात डेंग्यूचे सात, तर उरळ, हातरूण, पंचगव्हाण, पळसो बढे या गावांमध्ये मलेरियाचे पाच रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांची ही संख्या कमी असली, तरी धोका टळला नाही. अनेक रुग्णांमध्ये या कीटकजन्य आजारांची लक्षणे आढळल्याने आरोग्य विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. शहरात सर्वत्रच डासांसह माशांचाही प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे साथरोगसदृश आजार डोके वर काढत आहेत. विशेषत: डोकेदुखी, पोटदुखी, मळमळ होणे व अतिसार यासारखी लक्षणे दिसून येत आहेत.तालुकानिहाय रुग्णांची स्थितीडेंग्यूतालुका - रुग्ण संख्याबार्शीटाकळी - ३पातुर - १अकोला ता. - १तेल्हारा - १अकोला शहर - १मलेरियातालुका - रुग्ण संख्याबाळापूर - २तेल्हारा - २अकोला ता. - १लहान मुलांना सांभाळाकीटकांचा सर्वाधिक धोका लहान मुलांना आहे. त्यामुळे कीटकांपासून लहान मुलांना सांभाळण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.हे करा..घरासह परिसरात स्वच्छता राखा, घराच्या खिडक्यांना मच्छरविरोधी जाळी लावा, मच्छरदानीचा उपयोग करा, घरात पाणी साठवून ठेवू नका.कीटकजन्य आजारांची लक्षणे

  • अचानक थंडी वाजून ताप येणे
  • डोकेदुखी, शरीर बधिर होणे
  • पाठदुखीचा त्रास होणे
  • भूक न लागणे

साथरोग आणि कीटकजन्य आजारांची लक्षणे दिसताच नागरिकांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावा, आरोग्य विभागामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्रासह ग्रामीण रुग्णालय व सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुविधा उपलब्ध असून, मुबलक औषधसाठाही आहे.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्यdengueडेंग्यू