पिंपळगाव सराई येथे डेंग्यूची साथ

By Admin | Updated: September 28, 2014 00:30 IST2014-09-28T00:30:42+5:302014-09-28T00:30:42+5:30

बुलडाणा तालुक्यात डेंग्यूचे तीन रुग्ण आढळले : आरोग्य विभागाचे दुर्लक्ष.

With dengue in Pimpalgaon Sarai | पिंपळगाव सराई येथे डेंग्यूची साथ

पिंपळगाव सराई येथे डेंग्यूची साथ

पिंपळगाव सैलानी : बुलडाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई येथे डेंग्यूची साथ लागली असून, या गावातील एकाच वार्डात डेंग्यूचे तीन रुग्ण आढळले असून, त्यांच्यावर औरंगाबाद येथे खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.
पिंपळगाव सराई गावात गेल्या आठ दिवसांपासून तापाची साथ चालू असून, अजय शिवाजी सोनुने (वय ३ वर्ष), कार्तिक विष्णू सपकाळ (वय ७ वर्ष), विशाल पंजाबराव गायकवाड (वय १७ वर्ष) हे तीन रुग्ण बसस्थानकावरील एकाच वार्डातील असून, गावात तापाचे भरपूर रुग्ण आहेत. येथील लोकसंख्या आठ हजाराच्या जवळपास आहे व या गावात आरोग्य विभागाचे उपकेंद्र आहे; परंतु या उपकेंद्रात फक्त एकच आरोग्यसेविका आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी आरोग्य विभागाने त्वरित लक्ष देण्याची मागणी केली आहे.

Web Title: With dengue in Pimpalgaon Sarai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.