वन रँक वन पेन्शनसाठी माजी सैनिकांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

By राजेश शेगोकार | Updated: April 3, 2023 16:53 IST2023-04-03T16:53:29+5:302023-04-03T16:53:38+5:30

 तालुकास्तरावर तहसीलदारांना व जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सरकारचे माजी सैनिकांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले.

Demonstration of ex-servicemen in front of collector office for one rank one pension | वन रँक वन पेन्शनसाठी माजी सैनिकांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

वन रँक वन पेन्शनसाठी माजी सैनिकांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

अकाेला - केंद्र सरकारने लागु केलेल्या वन रँक वन पेन्शन मध्ये अनेक  त्रुटी आणी विराेधाभास आहे, ताे  दूर करून सैनिकांना वन पेन्शनचा योग्य मोबदला मिळावा, या मागणीसाठी जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

देशातील सर्व माजी सैनिक संघटनाच्या माध्यमातून सोमवारी सकाळी नवी दिल्ली येथे जंतर-मंतर मैदानावर आंदोलन सुरु करण्यात आले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व वन रँक वन पेन्शनचा योग्य मोबदला मिळण्यासाठी जिल्हास्तरावर, तालुकास्तरावर माजी सैनिकांनी आंदाेलनाचे हत्यार उपसले आहे.  तालुकास्तरावर तहसीलदारांना व जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सरकारचे माजी सैनिकांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले.

यावेळी शासकीय पुर्णनियुक्त माजी सैनिक संघटनेचे अकाेला जिल्हाध्यक्ष संताेष कुटे, अमर जवान माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सुभाष म्हैसने, सचिव रामरतन बुुुुुुळुकुळे, माजी सैनिक संघटना पातुरचे अध्यक्ष तुुकाराम निलखन, भारतीय माजी सैनिक संघटनेचे तेल्हारा अध्यक्ष सुभेदार सुरेश जावकार, भारतीय माजी सैनिक संघटनेचे अकाेला तालुका अध्यक्ष सुभेदार मेजर डी.पी. धांडे, यशसिद्धी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी आदी सहभागी झाले हाेते.

Web Title: Demonstration of ex-servicemen in front of collector office for one rank one pension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.