भाजप आमदारांचे निलंबन मागे घेण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:23 IST2021-07-07T04:23:59+5:302021-07-07T04:23:59+5:30
निवेदनात म्हटले आहे की, ओबीसी समाजाच्या हक्कासाठी सभागृहात ठराव मंजूर करण्यात येत होता. त्यावेळेस त्या ठरावामध्ये काही चुका होत्या ...

भाजप आमदारांचे निलंबन मागे घेण्याची मागणी
निवेदनात म्हटले आहे की, ओबीसी समाजाच्या हक्कासाठी सभागृहात ठराव मंजूर करण्यात येत होता. त्यावेळेस त्या ठरावामध्ये काही चुका होत्या आणि त्या चुका दुरुस्त करण्याकरिता विरोधी पक्षातील आमदारांनी विधानसभा अध्यक्षांना वेळ मागितला असता त्यांच्याकडून कोणताही वेळ न देता ठराव वाचण्यात येत होता. त्यामुळे विधानसभेतील भाजपच्या १२ आमदारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने, विधानसभा अध्यक्षांनी निलंबित करण्याचे आदेश दिले. या निलंबनाविरोधात ६ जुलै रोजी भाजप पातूर तालुका व शहराच्यावतीने निषेध करण्यात आला. यावेळी तालुका अध्यक्ष रमण जैन, मार्तण्डराव मोकळकर, गजानन निमकाळे, चंद्रकांत अंधारे, भिकाजी धोत्रे, श्रीकांत बराटे, अनंत बगाळे, राजू उगले, अभिजीत गहिलोत, कपिल खरप, वैशाली निकम, ॲड. रुपाली राऊत, मंजुषा लोथे, संगीता गालट, मंगेश केकन, विनेश चव्हाण, गोपाल गालट, सचिन बारोकार, गणेश गिरी, सचिन बायस, अजय लासुरकर, संतोष शेळके, निलेश फुलारी, संतोष इंगळे, गजानन शेंडे, विठ्ठल कवर, नितीन राऊत, धनंजय गालट उपस्थित होते.
फोटो:
060721\img-20210706-wa0145.jpg
बारा आमदार निलंबित तहसिलदारांना निवेदन