सर्वोपचार रुग्णालयातील औषधांचा तुटवडा दूर करण्याची प्रहारची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 15:45 IST2018-12-02T15:44:52+5:302018-12-02T15:45:35+5:30
अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्पोपचार रुग्णालयात अनेक समस्या निर्माण झाल्या असून, यामुळे रूग्णांच्या अडीअडचणी वाढल्या आहेत.रुग्णालय प्रशासनाने या समस्या त्वरित दूर करण्याची मागणी प्रहारच्या महानगर युवक शाखेच्या वतीने करण्यात आलीआहे.

सर्वोपचार रुग्णालयातील औषधांचा तुटवडा दूर करण्याची प्रहारची मागणी
अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्पोपचार रुग्णालयात अनेक समस्या निर्माण झाल्या असून, यामुळे रूग्णांच्या अडीअडचणी वाढल्या आहेत.रुग्णालय प्रशासनाने या समस्या त्वरित दूर करण्याची मागणी प्रहारच्या महानगर युवक शाखेच्या वतीने करण्यात आलीआहे.
प्रहारचे महानगर अध्यक्ष बिट्टू वाकोडे यांच्या नेतृत्वात अधिष्ठाता डॉ.राजेश कार्यकर्ते यांना निवेदन देण्यात आले. रूग्णालयातील औषधांचा साठा पूर्ववत करणे,अपुऱ्या खाटांची संख्या वाढविणे, एमआरआय मशीन उपलब्ध करणे, पिण्याचे पाणी, स्वछता व बाह्यरुग्ण विभाग दोन्ही वेळेस सुरु करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली. मागण्या त्वरित पूर्ण झाला नाहीत तर ‘प्रहार स्टाईल’ ने अभिनव आंदोलन छेडण्याचा इशारा वाकोडे यांनी निवेदनात दिला आहे.
या शिष्टमंडळात प्रहार महानगर चे जिल्हा संघटक शाम राऊत, महानगर उपाध्यक्ष मंगेश गणेशकर, उमेश पाटील, कुशल धाडसे, सुरज धायडे, गोलू जावळे, हरीश चांदुरकर, सोनू अंभोरे, गणेश परळकर, विशाल कासूरकर, गणेश लोळे, वैभव खडसे, अक्षय नागलकर, सय्यद नूर, गणेश शिरोकार, अंकुश ठाकूर, प्रशिक तायडे, शुभम टाले आदी उपस्थित होते.