झरंडी येथे रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:35 IST2020-12-12T04:35:51+5:302020-12-12T04:35:51+5:30
खेट्री: पातूर तालुक्यातील झरंडी येथे रस्त्यावर अतिक्रमण वाढले असून, वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. हे रस्त्यावरील अतिक्रमण त्वरित हटविण्याची ...

झरंडी येथे रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी
खेट्री: पातूर तालुक्यातील झरंडी येथे रस्त्यावर अतिक्रमण वाढले असून, वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. हे रस्त्यावरील अतिक्रमण त्वरित हटविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली असून, याबाबत ४ डिसेंबर रोजी तहसीलदारांकडे तक्रार दिली आहे. अतिक्रमण न हटविल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा तक्रारीतून दिला आहे.
पातूर तालुक्यातील झरंडी येथील रस्त्यावर अतिक्रमण वाढले आहे. नकाशाप्रमाणे नोंद असलेला पाच आणाचा रस्ता अडविल्याने ग्रामस्थांना दूरचा प्रवास करून गावात ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे येथील रस्ता मोकळा करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. अन्यथा उपोषणाचा इशारा झरंडीवासीयांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. निवेदनावर सुभाष राठोड, पंजाब राठोड, तारासिंग जाधव, योगेश जाधव, राहुल जाधव, हिरामन राठोड, रामदास लठाड, अंकुश राठोड, विक्रम जाधव, मधुकर जाधव, रामराव डाखोरे, परसराम जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.