सदर योजना राबवताना सर्व शाळांनी शालेय व्यवस्थापन समितीला विश्वासात घेऊन ही प्रक्रिया राबविली आहे. शिवाय याबाबत संपूर्ण जिल्ह्यात कुठेही संबंधित लाभार्थी पालकांची तक्रार आलेली नाही. सदर योजना राबविताना सर्व लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे. तसे शालेय व्यवस्थापन समित्यांची मान्यता सुद्धा आहे. मुख्याध्यापकांच्या वेतनातून कपात केलेली रक्कम त्यांना परत करण्याबाबत निर्णय घेऊन शिक्षकांना न्याय देण्यात यावा. अशी मागणी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, आमदार डॉ. रणजित पाटील यांच्याकडे जिल्हाध्यक्ष प्रकाश चतरकर, कार्यवाह सचिन काठोळे, वंदना बोर्डे, गजानन काळे, संतोष झामरे, किशोर चतरकर, मोहम्मद वसिमोद्दीन, दत्तात्रय सोनोने, रूजिता खेतकर, श्याम कुलट, संतोष वाघमारे, देवेंद्र वाकचवरे, नितीन बंडावार, सुनील माणिकराव-?????, रामभाऊ मालोकार, अरूण वाघमारे, मुरलीधर कुलट, कमलसिंग राठोड, दयाराम बंड, विश्वास पोहरे, रामदास भोपत, संतोषराव इंगळे, चंद्रशेखर पेठे, राजेश मसने, ग.सु.ठाकरे,समाधान उमप, रामदास वाघ यांनी केली आहे.
वेतनातून कपात केलेली टाय, बेल्ट व बूट, मोज्यांची रक्कम परत करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:23 IST