अकोट येथे कायमस्वरूपी पोलीस उपविभागीय अधिकारी पद भरण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:23 IST2021-08-12T04:23:38+5:302021-08-12T04:23:38+5:30

अकोटः जिल्ह्यामध्ये अकोट तालुका सर्वात मोठा तालुका असून, अतिसंवेदनशील म्हणून ओळखला जातो. त्यामुळे पोलीस उपविभागीय अधिकारीपद रिक्त असणे योग्य ...

Demand for permanent post of Police Sub-Divisional Officer at Akot | अकोट येथे कायमस्वरूपी पोलीस उपविभागीय अधिकारी पद भरण्याची मागणी

अकोट येथे कायमस्वरूपी पोलीस उपविभागीय अधिकारी पद भरण्याची मागणी

अकोटः जिल्ह्यामध्ये अकोट तालुका सर्वात मोठा तालुका असून, अतिसंवेदनशील म्हणून ओळखला जातो. त्यामुळे पोलीस उपविभागीय अधिकारीपद रिक्त असणे योग्य नाही. त्यामुळे पोलीस उपविभागीय अधिकारी पद कायमस्वरूपी भरावे, अशी मागणी काँग्रेस ब्रिगेडच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

काँग्रेस ब्रिगेडच्या वतीने दिलेल्या निवेदनानुसार, अकोट शहरासह तालुक्यात अकोट, तेल्हारा मतदारसंघात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित होण्यासाठी पोलीस उपविभागीय अधिकारी पद भरणे गरजेचे आहे. अकोटला उपविभागीय पोलीस अधिकारी कायमस्वरूपी देण्याचे आश्वासन, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी निवेदन देतेवेळी दिले. निवेदन काँग्रेस ब्रिगेडचे विदर्भ अध्यक्ष तथा युवक काँग्रेसचे माजी निरीक्षक मिलिंद नितोने यांच्या नेतृत्वात देण्यात आले. यावेळी काँग्रेस ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रोशन चिंचोलकर, काँग्रेस ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष नीलेश आग्रे, काँग्रेस ब्रिगेड शहराध्यक्ष विवेक सरदार, दीपक इंगळे, तालुका सचिव दीपक मोहिते आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (फोटो)

Web Title: Demand for permanent post of Police Sub-Divisional Officer at Akot