ग्रामपंचायत अंतर्गत केलेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:14 IST2021-06-18T04:14:17+5:302021-06-18T04:14:17+5:30
पंचायत समिती, मूर्तिजापूर अंतर्गत अनेक ग्रामपंचायतींमध्ये १४व्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे. अनेक ग्रामपंचायतींमध्ये १४व्या ...

ग्रामपंचायत अंतर्गत केलेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी
पंचायत समिती, मूर्तिजापूर अंतर्गत अनेक ग्रामपंचायतींमध्ये १४व्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे. अनेक ग्रामपंचायतींमध्ये १४व्या वित्त आयोगाच्या निधीमधून कामे न करता तसेच पैसे काढण्यात आले आहेत. कामे फक्त रेकॉर्डवर घेण्यात आली. मात्र प्रत्यक्षात कामे केली नाहीत. फक्त बिले काढून निधी लाटण्यात आला. या कामाची चौकशी होणे आवश्यक आहे, असे दिग्विजय गाडेकर यांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. १४व्या वित्त आयोगातील कामामध्ये अनेक ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या अपहाराची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी. अन्यथा २१ जूनपासून पंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा दिग्विजय गाडेकर, रा. हातगाव व नीलेश मधुकर मानके, रा. राजुरा घाटे यांनी दिला आहे.