ग्रामपंचायत निधीतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:17 IST2021-02-07T04:17:30+5:302021-02-07T04:17:30+5:30

चान्नी ग्रामपंचायतीमधील अंगणवाडी, डिजिटल शाळा, वित्त आयोग निधी, सार्वजनिक रस्ते, सार्वजनिक शौचालय, मुख्यमंत्री पेयजल योजना, आरो मशीन, ...

Demand for inquiry into misappropriation of Gram Panchayat funds | ग्रामपंचायत निधीतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी

ग्रामपंचायत निधीतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी

चान्नी ग्रामपंचायतीमधील अंगणवाडी, डिजिटल शाळा, वित्त आयोग निधी, सार्वजनिक रस्ते, सार्वजनिक शौचालय, मुख्यमंत्री पेयजल योजना, आरो मशीन, यामध्ये अनेक गैरव्यवहार झाल्याचा आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आला असून, वेळोवेळी तक्रार देऊनसुद्धा कारवाई होत नाही. त्यामुळे उपोषणाला बसणार असल्याचा इशारासुद्धा तक्रारीत देण्यात आला आहे, तसेच अपंग बांधवांकरिता येणारा निधी तीन टक्के व पाच टक्के निधीपासूनसुद्धा अपंग बांधव वंचित असल्याने हा निधी का थांबविण्यात आला, असा प्रश्न करण्यात आला. निवेदन देणाऱ्यांमध्ये भाजप युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष विठ्ठल ताले, अपंग संघटनेचे रामदास काकड आणि माजी सरपंच प्रेमचंद शर्मा, महादेव जानकर, अजय जैन, दिनकर इंगळे, अजय चाले, गजानन ताले, शंकर इंगळे, अक्षय बर्डे, प्रफुल्ल सरदार, नारायण इंगळे, रामदास काकड, मंगेश सोनवणे, नागेश सोनवणे, भीमराव सरदार, आकाश गिरे, कुणाल सोनवणे, वसंत येनकर यांचा समावेश होता.

Web Title: Demand for inquiry into misappropriation of Gram Panchayat funds