घरकुलांचे प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:18 IST2021-07-26T04:18:49+5:302021-07-26T04:18:49+5:30

तेल्हारा: पालिकेमध्ये सुरू असलेल्या पंतप्रधान घरकुल योजना, रमाई घरकुल योजना यासह इतर घरकुल योजनेतील लाभार्थींना त्वरित अनुदान देऊन गुंठेवारीचा ...

Demand for immediate solution of household issues | घरकुलांचे प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी

घरकुलांचे प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी

तेल्हारा: पालिकेमध्ये सुरू असलेल्या पंतप्रधान घरकुल योजना, रमाई घरकुल योजना यासह इतर घरकुल योजनेतील लाभार्थींना त्वरित अनुदान देऊन गुंठेवारीचा प्रश्न तत्काळ सोडवावा, अशी मागणी करीत विकास मंचने तोंडाला पट्टी बांधून आंदोन केले. तसेच मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले.

नगरपालिका अंतर्गत विविध योजनेंद्वारा घरकुलांचे कामे सुरू आहेत. अनेकांनी घरकुलाचे बांधकाम उसनवारी व व्याजाने पैसे आणून केले. सद्यस्थितीत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे लाभार्थींना विनाविलंब अनुदान द्यावे, तसेच गुंठेवारी व एनएबाबतचा प्रश्न तत्काळ निकाली काढून, योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रश्न निकाली न काढल्यास तेल्हारा विकास मंच आंदोलनाचा मार्ग स्वीकारणार, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. पालिकेमधील ठिय्या आंदोलनात विकास मंचचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Demand for immediate solution of household issues