घरकुलाचा लाभ देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:17 IST2021-03-20T04:17:20+5:302021-03-20T04:17:20+5:30

अकोला : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पत्नीच्या नावे घरकुलाचा लाभ देण्यासह विविध मागण्यांसाठी शिवदास वाहूरवाघ (रा. राहीत, ता. बार्शिटाकळी) यांनी ...

Demand for housing benefits | घरकुलाचा लाभ देण्याची मागणी

घरकुलाचा लाभ देण्याची मागणी

अकोला : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पत्नीच्या नावे घरकुलाचा लाभ देण्यासह विविध मागण्यांसाठी शिवदास वाहूरवाघ (रा. राहीत, ता. बार्शिटाकळी) यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे. तसेच मागणी पूर्ण न झाल्यास बुधवार २४ मार्चपासून उपोषणाचा इशारा दिला आहे.

-------------------------------------------------

कुंभारी येथे क्षेत्रकार्य कार्यक्रम

अकोला : कुंभारी येथे श्रीमती पंचफुलादेवी पाटील समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने क्षेत्रकार्य कार्यक्रम घेण्यात आला. डॉ. प्रा. संकेत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, वाचनालय येथे जाऊन माहिती गोळा करण्यात आली. नियोजन दीक्षा अरखराव व सुशांत बेलुरकर यांनी केले होते.

---------------------------------------------------

विवादित भाषण करणाऱ्यावर कारवाईची मागणी

अकोला : विवादित भाषण करणाऱ्या मलून वसीम रिझवी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मायनॉरीटीज डेमोक्रॅटिक पार्टी यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली. या भाषणाची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे सांगितले. या निवेदनावर मोहम्मद सोहेल कादरी, सैयद साहील रिजवी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Demand for housing benefits