बँक घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हेशाखेकडे देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:14 IST2021-07-11T04:14:53+5:302021-07-11T04:14:53+5:30
शिवसेेना तालुका संघटक रोशन पर्वतकर यांनी दिलेल्या निवेदनानुसार, अडगाव बु. येथील सेंट्रल बँक शाखेत आदिवासींना करण्यात आलेल्या ...

बँक घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हेशाखेकडे देण्याची मागणी
शिवसेेना तालुका संघटक रोशन पर्वतकर यांनी दिलेल्या निवेदनानुसार, अडगाव बु. येथील सेंट्रल बँक शाखेत आदिवासींना करण्यात आलेल्या कर्ज वाटपात ३५ लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा करण्यात आला आहे. पोलिसात तपासात हे उघड झाले आहे. या संदर्भात सेंट्रल बँक अकोल्याचे क्षेत्रीय प्रबंधक विद्याधर पेडणेकर यांनी हिवरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हिवखेड पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. इतर मुख्य आरोपी मोकळेच आहेत. या अटकेनंतर मात्र तपास करण्यात अकारण चालढकल होत असल्याचे जाणवत आहे. प्रत्यक्षात या प्रकरणात ११ लोकांवर गुन्हे दाखल केले आहे. त्यामुळे या सर्वांना तत्काळ अटक करणे गरजेचे आहे; परंतु या प्रकरणात हिवरखेड पोलीस कुचराई करीत असल्याचा आरोप केला आहे. फरार आरोपींना तत्काळ अटक करून चौकशी केल्यास यामध्ये बडे मासे अडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीरता पाहता आदिवासी बांधवांना न्याय मिळावा, यासाठी या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे द्यावा, अशी मागणीचे निवेदनातून रोशन पर्वतकर यांनी केली आहे.