ज्या ग्राहकांनी वीजबिलाचा भरणा केलेला नाही. अशा ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे धोरण वीज मंडळाने आखले असून अशा आगाऊ सूचनाही ग्राहकांना दिल्या आहेत. यासंदर्भात वीजबिल वापसी आंदोलनही छेडण्यात आले होते. कोरोनाकाळातील वीजबिल वापसी केलेले आहे, या अनुषंगाने कोरोना काळातील संपूर्ण वीजबिल वजा करून अधिक भार लावलेला आहे. तोसुध्दा वजा करून बिल निम्मे करून दुरुस्ती करावी, अशी मागणी विदर्भ आंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेश जोगळे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
वीजबिल आम्ही भरण्यास तयार असून विदर्भातील सामान्य जनतेने याबाबत वेळोवेळी आंदोलन करून शासनाच्या लक्षात आणून दिले आहे. मागणी पूर्ण न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.