रेल्वेस्थानकावरच प्रसूती; बालक दगावले

By Admin | Updated: September 8, 2014 00:00 IST2014-09-08T00:00:07+5:302014-09-08T00:00:07+5:30

लोहगड रेल्वेस्थानकावरच प्रसूती; नवजात बालकाचा उपचारादरम्यान अकोला येथील रुग्णालयात मृत्यू.

Delivery at the railway station; The child is dead | रेल्वेस्थानकावरच प्रसूती; बालक दगावले

रेल्वेस्थानकावरच प्रसूती; बालक दगावले

सायखेड : येथील गर्भवती महिलेस तपासणीसाठी अकोला येथे नेत असताना तिची लोहगड रेल्वेस्थानकावरच प्रसूती झाली. प्रसूतीनंतर पुरुष जातीच्या नवजात बालकाचा उपचारादरम्यान अकोला येथील रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना ५ सप्टेंबर रोजी घडली. सायखेड येथील भाग्यश्री बजरंग डाखोरे ही गर्भवती महिला अकोला येथे डॉक्टरांकडे तपासणीसाठी जाण्याकरिता लोहगड रेल्वे स्थानकावर आली. यावेळी तिला अचानक प्रसूती कळा सुरू झाल्या व काही वेळातच ती रेल्वेस्थानकावरच प्रसूत झाली. नवजात बालकाची प्रकृती गंभीर असल्याने महिलेच्या नातेवाईकांनी सायखेड येथील आशा स्वयंसेविका छाया इंगळे यांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर इंगळे यांनी रुग्णवाहिका बोलावून महिला व तिच्या बालकास उपचारासाठी धाबा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तेथे वैद्यकीय अधिकारी के. एस. मोकळकर यांनी तपासणी केली. बालकाचे वजन कमी असल्याने त्यांनी पुढील उपचारासाठी महिला व बालकास अकोला येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात पाठविले. तेथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना रात्री उशिरा बालकाचा मृत्यू झाला. महिलेची प्रकृती चांगली आहे.

Web Title: Delivery at the railway station; The child is dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.