रुग्णांना मुदतबाह्य औषधींचे वितरण
By Admin | Updated: April 17, 2016 01:15 IST2016-04-17T01:15:55+5:302016-04-17T01:15:55+5:30
अकोला जिल्ह्यात अतिसारामुळे रुग्ण त्रस्त; आरोग्य अधिकार्यांचा हलगर्जीपणा.

रुग्णांना मुदतबाह्य औषधींचे वितरण
आकोट (जि. अकोला): तालुक्यातील अतिसाराने ग्रस्त रुग्णांना आरोग्य विभागाच्या काही अधिकारी-कर्मचार्यांकडून मुदतबाह्य औषधींचे वितरण करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे. या संतापजनक प्रकाराला काही ग्रामस्थांनी दुजोरा दिला. शनिवारी आमदार रणधीर सावरकर यांनी खासगी डॉक्टर-कर्मचार्यांच्या चमूसह गावात धाव घेतली. चमूतील डॉक्टरांनी रुग्णांवर उपचार केले. गुरुवारी आरोग्य विभागाने मुदतबाह्य औषधी देण्यात आल्याचा आरोप काही रुग्णांनी यावेळी केला.
कावसा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणार्या विटाळी सावरगाव येथे बुधवारी दूषित पाणी िपल्यामुळे त्यांना अतिसाराने ग्रासले. रुपाली राजगुरू, अनंता नारे, निमाताई हरिभाऊ रावणकार, श्रद्धा गजानन ढोरे, अंजली ढोरे, पुष्पाबाई नारे, साक्षी राजगुरू, कल्पना राजगुरू, शिवकुमार नारे, पंचफुलाबाई इंगळे, सुभाष नारे, भारती नारे आदींना अतिसाराची लागण झाली.