दारूचे दुकान हटवा

By Admin | Updated: July 15, 2014 00:53 IST2014-07-15T00:53:28+5:302014-07-15T00:53:28+5:30

बोरगाव मंजू येथील महिलांचा आंदोलनाचा इशारा

Delete the liquor shop | दारूचे दुकान हटवा

दारूचे दुकान हटवा

अकोला : बोरगाव मंजू येथील देशी दारूचे दुकान न हटविल्यास उपोषणास बसण्याचा इशारा महिलांनी सोमवारी निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना सादर केलेल्या निवेदनात दिला आहे.
बोरगाव मंजू येथील संत रविदास चौकी मुख्य रस्त्यावर देशी दारूचे दुकान आहे. या दुकानाचा त्रास मुख्य बाजारपेठ आणि बसस्थानकावर जाणार्‍या महिलांना होतो. दारू पिणारे रस्त्यावरून जाणार्‍या ग्रामस्थांशी वादही घालतात.
मद्यपींचा त्रास विद्यार्थी-विद्यार्थिनींनाही होत आहे. त्यामुळे २६ जून रोजी पार पडलेल्या ग्रामसभेत दारूचे दुकान हटविण्याचा ठरावही घेण्यात आला.
दरम्यान, देशी दारूचे दुकान हटविण्यासाठी सोमवारी महिलांनी निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. दुकान न हटविल्यास ४ ऑगस्टपासून उपोषणास बसण्याचा इशारा महिलांनी भाग्यश्री देशमुख, सविता देशमुख, मीराबाई टाले, पार्वताबाई टाले, विमा शेगोकार, निर्मला टाले, सविता भटकर, नलिनी शेवंतकार, गजानन देशमुख यांच्यासह विजय बागडे, अशोक शेगोकार, राहुल देशमुख, संजय सुरजुसे, विनोद शेगोकार, अनिल रामेकर, रुपेश सुरजुसे, दोमधर मेहसराम, प्रमोद शेवतकर यांनी दिला.

Web Title: Delete the liquor shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.