वीज खांबांवरील सर्वच फलके हटवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:15 IST2021-02-05T06:15:39+5:302021-02-05T06:15:39+5:30
शहरात अनेक खांबांवर अनेक व्यावसायिकांनी आपल्या जाहिरातींची फलके लावलेली आहेत. या फलकांमुळे वीज अपघात होऊ शकतात व आपत्कालीन ...

वीज खांबांवरील सर्वच फलके हटवा
शहरात अनेक खांबांवर अनेक व्यावसायिकांनी आपल्या जाहिरातींची फलके लावलेली आहेत. या फलकांमुळे वीज अपघात होऊ शकतात व आपत्कालीन सेवेच्या वेळी अडचणी येतात. त्यामुळे ही फलके काढण्याची मोहीम महावितरणने सुरू केलेली आहे. तथापि, ही मोहीम राबविताना
काही विशिष्ट राजकीय पक्ष, संघटनांचे फलक मात्र खांबांवरून काढल्या जात नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. शिवा मोहोड, माजी नगरसेवक पंकज गावंडे यांच्या नेतृत्वात सोमवारी महावितरणच्या मुख्य कार्यालयावर धडक देऊन जाब विचारण्यात आला. यावेळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यास राज्यघटनेची प्रत भेट देण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महानगराध्यक्ष करण दोड, जिल्हा रायुकाँचे हर्षल ठोकरे, ज्ञानेश्वर ताले व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.