समाजकार्य महाविद्यालयात पदवी वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:22 IST2021-07-14T04:22:15+5:302021-07-14T04:22:15+5:30

अकोला: खडकी येथील श्रीमती पंचफुलादेवी पाटील समाजकार्य महाविद्यालयात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती उन्हाळी २०२० परीक्षेत पदवी प्राप्त व ...

Degree distribution in social work colleges | समाजकार्य महाविद्यालयात पदवी वितरण

समाजकार्य महाविद्यालयात पदवी वितरण

अकोला: खडकी येथील श्रीमती पंचफुलादेवी पाटील समाजकार्य महाविद्यालयात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती उन्हाळी २०२० परीक्षेत पदवी प्राप्त व गुणवत्ता यादीत आलेल्या बीएसडब्ल्यू व एमएसडब्लूच्या विद्यार्थ्यांना पदवी वितरण समारंभात मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. काेराेनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, सर्व शासकीय नियमांचे पालन करून, छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी ग्रामीण विकास शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ.संकेत काळे हाेते. यावेळी प्रा.डॉ.अमरीश गावंडे, प्राचार्य प्रा.डॉ.केशव गोरे, प्राचार्य विजय अग्रवाल यांची उपस्थिती होती. गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी आदिती पाचपोर, वैष्णवी कुकळकर, विवेक बंड, श्वेता वक्ते, अक्षय ढोकणे, भाग्यश्री घाटे, नितीन हांडे यांना पदवी बहाल करण्यात आली, तसेच सामाजिक कार्याचा गौरव म्हणून श्रीकांत तळोकार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा.डॉ.बळीराम अवचार, प्रा.डॉ.प्रफुल पवार, प्रा.नवनाथ बडे, प्रा.डॉ.कविता कावरे, प्रा.वागतकर, प्रा.डॉ.अर्चना धर्मे, प्रा.परळीकर आदी उपस्थित होते. संचालन प्रा.मनोहर वागतकर, तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ.बळीराम अवचार यांनी केले.

Web Title: Degree distribution in social work colleges