विटा भाजण्यासाठी वृक्षतोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:53 IST2020-12-04T04:53:21+5:302020-12-04T04:53:21+5:30
महसूल विभागाचे गौण खनिज चोरीवर नियंत्रण नाही बाळापूर: परिसरात मोठ्या प्रमाणात गौण ...

विटा भाजण्यासाठी वृक्षतोड
महसूल विभागाचे गौण खनिज चोरीवर नियंत्रण नाही
बाळापूर: परिसरात मोठ्या प्रमाणात गौण खनिजाची चाेरी होत आहे. गौण खनिजापासून महसूलही मिळतो; परंतु मोठ्या प्रमाणात गौण खनिजाची होणाऱ्या चोऱ्यावर नियंत्रण ठेवणारे महसूल अधिकारी हेतूपुरस्पर दुर्लक्ष करीत असल्याने माती, रेती, मुरुमाची सर्रास चोरी हाेत आहे. कुठलीही कारवाई नसल्याने गौण माफियांची चांदी होत आहे.