न्यायालयाचे अटी, शर्तीचा भंग केल्याने आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:17 IST2021-03-20T04:17:31+5:302021-03-20T04:17:31+5:30

बाळापूर: पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अल्पवयीन युवतीचा एका दि. १६ आक्टोबर २०१९ रोजी विनयभंग केल्याची घटना ...

Defendant arrested for breach of court conditions | न्यायालयाचे अटी, शर्तीचा भंग केल्याने आरोपीस अटक

न्यायालयाचे अटी, शर्तीचा भंग केल्याने आरोपीस अटक

बाळापूर: पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अल्पवयीन युवतीचा एका दि. १६ आक्टोबर २०१९ रोजी विनयभंग केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात युवकाला जामीन मिळाला होता. न्यायालयाने दिलेल्या अटी, शर्तीचा भंग केल्याने युवकाला न्यायालयाचे आदेशाने अटक करीत आरोपीची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली.

बाळापूर पोलीस स्टेशन हद्दीतील अल्पवयीन युवती कोचिंग क्लाससाठी बाळापूर येथे आली असता. युवकाने तिचा पाठलाग करून अकोला नाका येथे विनयभंग केला होता. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून बाळापूर पोलिसांनी आरोपी धनराज गजानन इंगळे यांच्या विरुध्द भादंविच्या ३५४अ व ३५४डी नुसार गुन्हा दाखल केला होता. आरोपीला दि. ९ डिसेंबर २०१९ रोजी नागपूर उच्च न्यायालयाने अटी व शर्तीवर जामीन मंजूर केला होता. मात्र आरोपीने न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने उच्च न्यायालयाने दिलेला जामीन रद्द करण्यासाठी फिर्यादीच्या वडिलांनी न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने आरोपीचा जामीन नामंजूर केला. न्यायालयाचे आदेशाने दि. ९ मार्च २०२१ ला बाळापूर पोलिसांनी आरोपीला अटक करून जिल्हा कारागृहात रवानगी केली.

Web Title: Defendant arrested for breach of court conditions