शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

निकृष्ट सिमेंट रस्ते; कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिला महापौरांना प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 1:25 PM

अकोला: महापालिका प्रशासनाच्या अखत्यारीत तयार करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यांप्रकरणी कारवाईसाठी जिल्हाधिकारी तथा मनपाचे प्रभारी आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी महापौर विजय अग्रवाल यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे.

अकोला: महापालिका प्रशासनाच्या अखत्यारीत तयार करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यांप्रकरणी कारवाईसाठी जिल्हाधिकारी तथा मनपाचे प्रभारी आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी महापौर विजय अग्रवाल यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रस्ताव महासभेत ठेवला जाणार असून, संबंधित अभियंता, कनिष्ठ अभियंता तसेच कंत्राटदारावर सत्ताधारी भाजपकडून नेमकी कोणती कारवाई केली जाते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.२०१२ मध्ये शहरातील प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मनपाला १५ कोटींचा निधी देण्यात आला होता. त्यातून सहा सिमेंटचे तसेच ११ डांबरी रस्त्यांचा समावेश होता. सिमेंट रस्त्यांसाठी तब्बल सहा वेळा निविदा काढण्यात आली होती. यापैकी पाच सिमेंट रस्त्यांची कामे करण्याचा कंत्राट स्थानिक आरआरसी कंपनीला देण्यात आला. रस्ते दुरुस्तीच्या अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीतच या रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडल्याचे समोर आले होते. यासंदर्भात भाजप लोकप्रतिनिधी, पदाधिकाºयांनी आक्षेप नोंदवल्यानंतर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, गुणनियंत्रण जलसंपदा विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाची प्रयोगशाळा इत्यादी तीन यंत्रणांमार्फत रस्ते कामांचे २२ ते २७ जुलै २०१८ दरम्यान सोशल आॅडिट केले. या आॅडिटमध्ये महापालिकेसह सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तयार केलेल्या रस्त्यांचे पितळ उघडे पडले.जिल्हाधिकाºयांना ‘व्हीसी’द्वारे निर्देशनिकृष्ट सिमेंट रस्ते प्रकरणात पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांनी १३ डिसेंबर रोजी आयोजित ‘व्हीसी’द्वारे जिल्हाधिकारी तथा मनपाचे प्रभारी आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांना जबाबदारी निश्चित करून कारवाईचा प्रस्ताव सभागृहाकडे सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार प्रभारी आयुक्त पाण्डेय यांनी १५ डिसेंबर रोजी कारवाईचा प्रस्ताव महापौर विजय अग्रवाल यांच्याकडे सादर केल्याची माहिती आहे.यांना दिली होती ‘शो कॉज’!स्थानिक ‘आरआरसी’ कंपनीने पाच सिमेंट रस्त्यांची दुरुस्ती केली. या प्रत्येक रस्त्याच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी मनपाने तत्कालीन शहर अभियंता इक्बाल खान, कार्यकारी अभियंता अजय गुजर, तसेच तत्कालीन उपअभियंता अनिल गावंडे, तत्कालीन उपअभियंता रवींद्र जाधव, कनिष्ठ अभियंता युसूफ खान रफिक अहमद खान, कृष्णा वाडेकर, शशिकांत गुहे व मनोज गोगटे यांची नियुक्ती केली होती. संबंधितांना शो कॉज बजावण्यात आली असून, त्यांच्यावर सत्ताधारी भाजपकडून काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेयAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका