शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
2
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
3
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
4
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
5
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
6
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
7
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
8
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
9
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
10
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
11
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
12
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
13
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
14
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
15
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
16
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
17
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका
20
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प

कर्ज वसुलीचा मुद्दा दुष्काळात ऐरणीवर; अकोला जिल्ह्यातील ९९0 गावांत दुष्काळ जाहीर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 2:07 AM

अकोला : तत्त्वत: आणि निकषानुसार शेतकºयांना कर्जमाफी देताना ३० जून २०१६ पर्यंत थकीत कर्जापैकी १ लाख ५० हजारांच्या मर्यादेत शासनाकडून माफीचा लाभ दिला जात आहे. त्यासाठी मुदतीत न बसलेल्या कर्जाची रक्कम भरल्यानंतरच शेतकºयांच्या खात्यात शासकीय रक्कम पडणार आहे. आता शासनाने दुष्काळ घोषित केला. उपाययोजनांमध्ये पीक कर्ज वसुलीला स्थगिती दिली. त्यामुळे कर्जमाफीच्या लाभासाठी शिल्लक रक्कम शेतकºयांकडून वसूल होईल की बँका सवलत देतील, हा मुद्दाही आता वादाचा ठरणार आहे.

ठळक मुद्देनिकषांची आडकाठी 

सदानंद सिरसाट। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : तत्त्वत: आणि निकषानुसार शेतकºयांना कर्जमाफी देताना ३० जून २०१६ पर्यंत थकीत कर्जापैकी १ लाख ५० हजारांच्या मर्यादेत शासनाकडून माफीचा लाभ दिला जात आहे. त्यासाठी मुदतीत न बसलेल्या कर्जाची रक्कम भरल्यानंतरच शेतकºयांच्या खात्यात शासकीय रक्कम पडणार आहे. आता शासनाने दुष्काळ घोषित केला. उपाययोजनांमध्ये पीक कर्ज वसुलीला स्थगिती दिली. त्यामुळे कर्जमाफीच्या लाभासाठी शिल्लक रक्कम शेतकºयांकडून वसूल होईल की बँका सवलत देतील, हा मुद्दाही आता वादाचा ठरणार आहे.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून कर्जमाफीचा लाभ देताना शेतकºयांवर भीक नको, पण कुत्रे आवर, म्हणण्याची वेळ आणली. शासन निर्णय झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात ३० जून २०१६ पर्यंत थकीत असलेल्या शेतकºयांची संख्या मागवण्यात आली. अकोला जिल्ह्यात एकूण २,७९,००० पैकी १,६९,९२० एवढे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असल्याचे पुढे आले. आॅनलाइन अर्ज केल्यानंतर ती संख्या १,३८,९६३ वर स्थिरावली. त्या शेतकºयांच्या खात्यात शासनाकडून रक्कम जमा करणे सुरू आहे. त्याचवेळी कर्जदार शेतकºयांकडे शासनाने ठरवून दिलेले मुदतबाह्य कर्जही निश्चित केले जात आहे. प्रत्येक शेतकºयांकडे असलेल्या एकूण थकीत कर्जापैकी ४० ते ५० टक्के रक्कम शासनाने ठरवून दिलेल्या थकीत शब्दाच्या मुदतीत न बसणारी ठरत आहे. त्यातही कर्जमाफ होणारी रक्कम १ लाख ५० हजारांपेक्षा कितीतरी कमी होत आहे. त्यामुळे नगण्य प्रमाणातील शेतकºयांनाच १ लाख ५० हजार रुपये एवढी माफी मिळण्याची शक्यता आहे. १ लाख ५० हजारांपेक्षा अधिक कर्ज रक्कम थकीत शेतकºयांना किमान ६० ते ७० हजार रुपये बँकेत आधी भरावे लागणार आहेत. शेतकºयांकडून ती रक्कम जमा झाल्याची खात्री बँक व्यवस्थापनाकडून झाल्यानंतरच शासनाच्या कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा होणार आहे. ती रक्कम भरण्यासाठी शासन तसेच बँकांकडून ३१ मार्च २०१८ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. 

दुष्काळात थकीत कर्ज कसे भरणार?शासनाने राज्यातील १४ हजारांपेक्षाही अधिक गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला. अकोला जिल्ह्यातील ९९० गावे दुष्काळी आहेत. दुष्काळी उपाययोजनांमध्ये पीक कर्ज वसुलीला स्थगिती, सहकारी कर्जाचे पुनर्गठन करण्याची सोय आहे; मात्र जिल्ह्यातील बँका ती सोय शेतकºयांना देतात की वसुली करतात, हा मुद्दा गंभीर होणार आहे. कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी भरावयाची थकीत रक्कमही मोठी असल्याने ती कशी भरावी, ही समस्याही उभी ठाकली आहे. 

शासनाच्या कर्जमाफीची रक्कम ‘आॅन होल्ड’!शासनाने शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली. मात्र, ती रक्कम ‘होल्ड’ ठेवण्यात आली. जोपर्यंत शेतकरी त्यांच्याकडे थकीत कर्जाची रक्कम बँकेत जमा करत नाहीत. तोपर्यंत शासनाची रक्कम त्यांच्या खात्यात दिसेल मात्र, जमा होणार नाही, अशीच व्यवस्था करण्याचे बँकांना बजावण्यात आले. 

टॅग्स :Akolaअकोला