कर्ज वसुलीचा मुद्दा दुष्काळात ऐरणीवर; अकोला जिल्ह्यातील ९९0 गावांत दुष्काळ जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 02:07 IST2018-03-05T02:07:20+5:302018-03-05T02:07:20+5:30
अकोला : तत्त्वत: आणि निकषानुसार शेतकºयांना कर्जमाफी देताना ३० जून २०१६ पर्यंत थकीत कर्जापैकी १ लाख ५० हजारांच्या मर्यादेत शासनाकडून माफीचा लाभ दिला जात आहे. त्यासाठी मुदतीत न बसलेल्या कर्जाची रक्कम भरल्यानंतरच शेतकºयांच्या खात्यात शासकीय रक्कम पडणार आहे. आता शासनाने दुष्काळ घोषित केला. उपाययोजनांमध्ये पीक कर्ज वसुलीला स्थगिती दिली. त्यामुळे कर्जमाफीच्या लाभासाठी शिल्लक रक्कम शेतकºयांकडून वसूल होईल की बँका सवलत देतील, हा मुद्दाही आता वादाचा ठरणार आहे.

कर्ज वसुलीचा मुद्दा दुष्काळात ऐरणीवर; अकोला जिल्ह्यातील ९९0 गावांत दुष्काळ जाहीर
सदानंद सिरसाट।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : तत्त्वत: आणि निकषानुसार शेतकºयांना कर्जमाफी देताना ३० जून २०१६ पर्यंत थकीत कर्जापैकी १ लाख ५० हजारांच्या मर्यादेत शासनाकडून माफीचा लाभ दिला जात आहे. त्यासाठी मुदतीत न बसलेल्या कर्जाची रक्कम भरल्यानंतरच शेतकºयांच्या खात्यात शासकीय रक्कम पडणार आहे. आता शासनाने दुष्काळ घोषित केला. उपाययोजनांमध्ये पीक कर्ज वसुलीला स्थगिती दिली. त्यामुळे कर्जमाफीच्या लाभासाठी शिल्लक रक्कम शेतकºयांकडून वसूल होईल की बँका सवलत देतील, हा मुद्दाही आता वादाचा ठरणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून कर्जमाफीचा लाभ देताना शेतकºयांवर भीक नको, पण कुत्रे आवर, म्हणण्याची वेळ आणली. शासन निर्णय झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात ३० जून २०१६ पर्यंत थकीत असलेल्या शेतकºयांची संख्या मागवण्यात आली. अकोला जिल्ह्यात एकूण २,७९,००० पैकी १,६९,९२० एवढे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असल्याचे पुढे आले. आॅनलाइन अर्ज केल्यानंतर ती संख्या १,३८,९६३ वर स्थिरावली. त्या शेतकºयांच्या खात्यात शासनाकडून रक्कम जमा करणे सुरू आहे.
त्याचवेळी कर्जदार शेतकºयांकडे शासनाने ठरवून दिलेले मुदतबाह्य कर्जही निश्चित केले जात आहे. प्रत्येक शेतकºयांकडे असलेल्या एकूण थकीत कर्जापैकी ४० ते ५० टक्के रक्कम शासनाने ठरवून दिलेल्या थकीत शब्दाच्या मुदतीत न बसणारी ठरत आहे.
त्यातही कर्जमाफ होणारी रक्कम १ लाख ५० हजारांपेक्षा कितीतरी कमी होत आहे. त्यामुळे नगण्य प्रमाणातील शेतकºयांनाच १ लाख ५० हजार रुपये एवढी माफी मिळण्याची शक्यता आहे.
१ लाख ५० हजारांपेक्षा अधिक कर्ज रक्कम थकीत शेतकºयांना किमान ६० ते ७० हजार रुपये बँकेत आधी भरावे लागणार आहेत. शेतकºयांकडून ती रक्कम जमा झाल्याची खात्री बँक व्यवस्थापनाकडून झाल्यानंतरच शासनाच्या कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा होणार आहे. ती रक्कम भरण्यासाठी शासन तसेच बँकांकडून ३१ मार्च २०१८ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
दुष्काळात थकीत कर्ज कसे भरणार?
शासनाने राज्यातील १४ हजारांपेक्षाही अधिक गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला. अकोला जिल्ह्यातील ९९० गावे दुष्काळी आहेत.
दुष्काळी उपाययोजनांमध्ये पीक कर्ज वसुलीला स्थगिती, सहकारी कर्जाचे पुनर्गठन करण्याची सोय आहे; मात्र जिल्ह्यातील बँका ती सोय शेतकºयांना देतात की वसुली करतात, हा मुद्दा गंभीर होणार आहे.
कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी भरावयाची थकीत रक्कमही मोठी असल्याने ती कशी भरावी, ही समस्याही उभी ठाकली आहे.
शासनाच्या कर्जमाफीची रक्कम ‘आॅन होल्ड’!
शासनाने शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली. मात्र, ती रक्कम ‘होल्ड’ ठेवण्यात आली. जोपर्यंत शेतकरी त्यांच्याकडे थकीत कर्जाची रक्कम बँकेत जमा करत नाहीत.
तोपर्यंत शासनाची रक्कम त्यांच्या खात्यात दिसेल मात्र, जमा होणार नाही, अशीच व्यवस्था करण्याचे बँकांना बजावण्यात आले.