जखमी अवस्थेत आढळून आलेल्या युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:18 IST2021-02-14T04:18:14+5:302021-02-14T04:18:14+5:30
तालुक्यातील माना पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम ताकवाडा येथील चक्रधर विष्णुदास मेतकर (२८)हा बाजारासाठी मूर्तिजापूर येथे आला होता. ...

जखमी अवस्थेत आढळून आलेल्या युवकाचा मृत्यू
तालुक्यातील माना पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम ताकवाडा येथील चक्रधर विष्णुदास मेतकर (२८)हा बाजारासाठी मूर्तिजापूर येथे आला होता. परंतु तो रात्री गावी पोहोचलाच नाही. रात्री २ वाजता गस्तीवरील पोलिसांना तो येथील नगर परिषद आवारात जखमी अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी तात्काळ त्याला लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने सर्वोपचार रूग्णालयात पाठविण्यात आले होते. परंतु डॉक्टरांनी त्याला नागपूर येथे हलविण्याचा सल्ला दिला. नागपूर येथे नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. रात्री घरी परत जाताना राष्ट्रीय महामार्गावरील खरब खरबडी गावाजवळ दुचाकीवरुन पडून जखमी झाल्याचे मृत्यूपूर्व त्याने दिले. परंतु ताकवाडा गाव हिरपूर रस्त्यावर खापरवाडा गावाजवळ आहे. मग चक्रधरने राष्ट्रीय महामार्गावरुन जाण्याची गरज काय. त्याचा अपघात झाल्यावर तो, मूर्तिजापुरात पायी आला. मग तो थेट रुग्णालयात का गेला नाही. असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.