वीज पडल्याने युवा शेतक-याचा मृत्यू
By Admin | Updated: June 19, 2015 02:53 IST2015-06-19T02:53:40+5:302015-06-19T02:53:40+5:30
अकोला तालुक्यातील रामगाव येथील घटना.

वीज पडल्याने युवा शेतक-याचा मृत्यू
बोरगाव मंजू (जि. अकोला): वीज पडल्याने एका युवा शेतकर्याचा बुधवारी मृत्यू झाला. ही घटना अकोला तालुक्यातील रामगाव येथे घडली. सागर महादेव गावंडे (२६)हे मृत्यूमुखी पडलेल्या शेतकर्याचे नाव आहे. तो बुधवारी शेतात पिकांना खत देण्यासाठी गेला. त्यासोबत मंजूरही होते. अचानक वातावरणात बदल झाला. काही क्षणातच अंगावर वीज कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला. ंत्याला दोन अपत्य आहेत. घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी व पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. याप्रकरणी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.