वीज पडून युवा शेतक-याचा मृत्यू
By Admin | Updated: June 22, 2016 00:18 IST2016-06-22T00:18:23+5:302016-06-22T00:18:23+5:30
आकोट तालुक्यातील खेर्डा येथील घटना

वीज पडून युवा शेतक-याचा मृत्यू
आकोट (जि. अकोला) : तालुक्यातील खेर्डा येथील २५ वर्षीय युवा शेतकर्याच्या अंगावर वीज पडल्याने दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना २१ जून रोजी रात्री ८.३0 वाजता सुमारास घडली. तांदुळवाडी - सोनबर्डी रस्त्यावर असलेल्या खेर्डा येथील युवा शेतकरी सचिन अरुण पिंजरकर हा आपल्या वडिलांसोबत पाणेरी शेतशिवारात ट्रॅक्टरने शेतीची मशागत करत होता. दरम्यान वीजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. यावेळी सचिनच्या अंगावर वीज पडल्याने तो गंभीररीत्या भाजला. त्याला आकोट ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.