मूर्तिजापूर रेल्वे स्टेशनवर महिलेचा मृत्यू

By Admin | Updated: June 21, 2017 17:19 IST2017-06-21T17:19:45+5:302017-06-21T17:19:45+5:30

मूर्तिजापूर रेल्वे स्टेशनवरील प्लॉटफॉर्म नं-१ येथे एका ७0 वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे.

Death of woman at Murtijapur railway station | मूर्तिजापूर रेल्वे स्टेशनवर महिलेचा मृत्यू

मूर्तिजापूर रेल्वे स्टेशनवर महिलेचा मृत्यू

मूर्तिजापूर : मूर्तिजापूर रेल्वे स्टेशनवरील प्लॉटफॉर्म नं-१ येथे एका ७0 वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. प्रथमदर्शनीच्या पाहणीवरून या महिलेचा मृत्यू हा नैसर्गिक झाला असल्याचे नमूद करून रेल्वे पोलीस स्टेशन ठाणे अकोला येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत महिलेचा रंग सावळा, डोक्याचे केस पांढरे, सतपातळ बांधा आणि मुख्य ओळख म्हणून अंगात गुलाबी पातळ व गुलाबी ब्लाऊज परिधान आहे. अशा वर्णनाची मृत महिला असून, ओळखणार्‍या व्यक्तीने बी. डी. गवई रेल्वे स्टेशन दूरक्षेत्र मूर्तिजापूर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Death of woman at Murtijapur railway station