रेल्वेतून पडून इसमाचा मृत्यू

By Admin | Updated: July 1, 2016 02:04 IST2016-07-01T02:04:39+5:302016-07-01T02:04:39+5:30

मृतक वाशिम जिल्ह्यातील.

Death from the train and death | रेल्वेतून पडून इसमाचा मृत्यू

रेल्वेतून पडून इसमाचा मृत्यू

मूर्तिजापूर (जि. अकोला): वाशिमकडून अकोल्याकडे जाणार्‍या एका ४५ वर्षीय इसमाचा रेल्वेतून पडल्याने येथील उड्डाणपुलानजीक रेल्वे खांब नं. १४ जवळ दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २९ जूनच्या उशिरा रात्री घडली. नवनाथ आसाराम वाणी (४५) रा. वारा जहागीर, ता. जि. वाशिम असे मृतकाचे नाव आहे. नवनाथ वाणी हा इसम वाशिम मूर्तिजापूरमार्गे अकोल्याकडे पाल्याच्या शैक्षणिक कामासाठी जात होता. रेल्वेने प्रवास करीत असताना मूर्तिजापूर-मानादरम्यान येथील उड्डाणपुलानजीक खांब नं. १४ जवळ पडून जागीच मृत्यू झाल्याची नोंद ३0 जूनला पो. स्टे. ला झाली. सदर मृतकाजवळ ओळखपत्र व विविध महत्त्वपूर्ण दस्ताऐवज सापडल्याने मृतकाची ओळख पटविणे सहज झाले. पोहेकाँ दीपक पुंडगे, पोकाँ. सतीश अघडते यांनी मृतकाची ओळख पटविण्यासाठी (परिश्रम घेतले) काम पाहिले.

Web Title: Death from the train and death