रेल्वेतून पडून इसमाचा मृत्यू
By Admin | Updated: October 29, 2014 01:45 IST2014-10-29T01:45:41+5:302014-10-29T01:45:41+5:30
यावलखेडजवळ रेल्वेतून पडून एका अनोळखी इसमाचा मृत्यू.

रेल्वेतून पडून इसमाचा मृत्यू
अकोला : यावलखेडजवळ रेल्वेतून पडून सोमवारी एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाला. याप्रकरणी रेल्वे स्थानक उपप्रबंधकांच्या तक्रारीवरून रेल्वे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मृतक इसमाचे वय अंदाजे ४५ वर्षे आहे. वर्ण निमगोरा असून, शरीरबांधा मजबूत आणि डोक्यावरचे केस काळे आहेत. चेहरा गोल आहे. मृतकाची ओळख पटविण्याच्या कामी संबधितांनी रेल्वे पोलिसांशी संर्पक साधावा, असे पोलिस नाईक मनोहर अंभोरे यांनी कळविले.