तलावात बुडून युवतींचा मृत्यू

By Admin | Updated: October 21, 2014 00:06 IST2014-10-21T00:06:45+5:302014-10-21T00:06:45+5:30

रिसोड येथील घटना, कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन युवती परतल्याच नाहीत.

Death toll in the tank | तलावात बुडून युवतींचा मृत्यू

तलावात बुडून युवतींचा मृत्यू

रिसोड (जि. वाशिम) : कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन युवतींचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी मोठेगाव येथील घडली.
पुजा राजू धोंगडे (१८) आणि प्रिती अशोक धोंगडे (१५) अशी त्यांची नावे आहेत.
दोघी कपडे धुण्यासाठी गावालगतच्या तलावावर गेल्या. धुणी झाल्यानंतर दोघीही पोहण्यासाठी तलावात उतरल्या. मध्यभागी गेल्यावर काही कळण्यापूर्वी त्या पाण्यात बूडू लागल्या. मदतीसाठी त्यांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील गुराखी मदतीसाठी धाव घे तली. गुराखी व ग्रामस्थांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: Death toll in the tank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.