विष प्राशन केलेल्या युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:46 IST2021-01-13T04:46:25+5:302021-01-13T04:46:25+5:30

कुरूम : मूर्तिजापूर तालुक्यातील कुरूम येथील २४ वर्षीय युवकाने ७ जानेवारी राेजी विष प्राशन केले हाेते. त्याचा उपचारादरम्यान ...

Death of a poisoned youth | विष प्राशन केलेल्या युवकाचा मृत्यू

विष प्राशन केलेल्या युवकाचा मृत्यू

कुरूम : मूर्तिजापूर तालुक्यातील कुरूम येथील २४ वर्षीय युवकाने ७ जानेवारी राेजी विष प्राशन केले हाेते. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना १० जानेवारीला दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली.

कुरूम येथील पद्मिनी चौकातील रहिवासी गणेश हरिभाऊ डांबरे (२४) हा अमरावती येथे खासगी काम करून मोलमजुरी करत हाेता. ७ जानेवारीला उशिरा रात्री तो अमरावतीवरून कुरूम येथे त्याच्या घरी आला व झोपला. यादरम्यान त्याला मध्यरात्री ओकारी झाली असता त्याच्या वडिलांनी गणेशला, काय झाले अशी विचारणा केली असता त्याने विष प्राशन केल्याचे वडिलांना सांगितले. यावेळी त्याचा लहान भाऊ उमेश व शेजाऱ्यांनी गणेशला खासगी रुग्णालयात व तेथून प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविले. परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने प्रा. आ. केंद्राच्या रुग्णवाहिकेने पुढील उपचारासाठी अमरावती येथील इर्विन रुग्णालयात हलविले. उपचारादरम्यान त्याची आज प्राणज्योत मालवली. गणेशने विष प्राशन केल्याचे कारण समजू शकले नाही. त्याच्या पश्चात वडील, लहान भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.

Web Title: Death of a poisoned youth