अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2017 03:29 IST2017-02-07T03:29:09+5:302017-02-07T03:29:09+5:30

ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल.

Death of injured child accident | अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू

अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू

चोहोट्टाबाजार(अकोला), दि. ६- भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने पंचगव्हाण येथील दोन सख्ख्ये भावंड गंभीर जखमी झाल्याची घटना ५ फेब्रुवारी रोजी घडली होती. जखमी भावंडांपैकी भास्कर भोंगरे (२४ ) या युवकाचा सोमवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. पंचगव्हाण येथील भास्कर मनोहर भोंगरे, प्रमोद मनोहर भोंगरे हे दोघे सख्खे भाऊ मुलगी पाहण्यासाठी निंभोरा येथे जात होते. दरम्यान, चोहोट्टाजवळ त्यांच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली. यामध्ये दोघेही भावंडे गंभीर जखमी झाले होते. त्यांना अकोला येथे उपचारार्थ हलविण्यात आले होते. सोमवारी पहाटे उपचारादरम्यान भास्करचा मृत्यू झाला. याप्रकरणी युवकांचे काका माणिकराव भोंगरे यांच्या फिर्यादीवरून दहीहांडा पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या मागे आई, वडील दोन भाऊ असा आप्त परिवार आहे.

Web Title: Death of injured child accident