विष प्राशन करणा-या शेतकर्याचा मृत्यू
By Admin | Updated: July 14, 2015 02:04 IST2015-07-14T02:04:32+5:302015-07-14T02:04:32+5:30
अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

विष प्राशन करणा-या शेतकर्याचा मृत्यू
धनज बु. (जि. वाशिम): सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून धनज बु. येथील शेतकर्याने ८ जुलै रोजी विष प्राशन केले होते. त्या शे तकर्याचा अमरावती येथे उपचारादरम्यान सोमवारी मृत्यू झाला.
मृतक शेतकरी देविदास वामनराव टाके (५८) यांच्याकडे कोरडवाहू शेतजमीन आहे. त्यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती बँके चे १ लाख ७0 हजार रुपये कर्ज होते. या कर्जाचे पुनर्गठन करण्यात न आल्याने ते चिंताग्रस्त होते. त्यातच गत काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतातील सोयाबीन पीक पार सुकून गेले. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळल्याने त्यांनी स्वत:च्या शेतात ८ जुलै रोजी विषारी औषध प्राशन केले. त्यांना तात्काळ उपचाराकरिता अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु उपचारादरम्यान १२ जुलैच्या मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन मुले, सून, पत्नी व मुलगी असा परिवार आहे.