वीज पडल्याने शेतक-याचा मृत्यू; एक जखमी

By Admin | Updated: June 22, 2015 02:20 IST2015-06-22T02:20:33+5:302015-06-22T02:20:33+5:30

आकोट तालुक्यातील राजुरा येथील घटना.

Death of a farmer due to power failure; One injured | वीज पडल्याने शेतक-याचा मृत्यू; एक जखमी

वीज पडल्याने शेतक-याचा मृत्यू; एक जखमी

आकोट (जि. अकोला): अंगावर वीज पडल्याने राजुरा येथील एका शेतकर्‍याचा मृत्यू झाला. दुसरा शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना २१ जून रोजी सायंकाळी ६.३0 वाजता सुमारास घडली. शेतकरी पेरणी करून घरी जात असताना ही घटना घडली. आकोट तालुक्यातील राजुरा शेतशिवारात रविवारी संध्याकाळी वादळीवार्‍यासह पाऊस झाला. यावेळी विजेचा कडकडाट सुरू होता. भिलखेड शेतशिवारातील धरणाच्या भिंतीजवळ वीज कोसळून राजुरा येथील महादेव शितकारे या ५८ वर्षीय शेतकर्‍याचा मृत्यू झाला. येथून जवळच असलेले शेतकरी धोंडू बक्सरे (६५) हे गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळावर धाव घेऊन त्यांना ग्रामीण रुग्णालयात भरती केले. मात्र, महादेव शितकारे यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. शितकारे यांच्याकडे चार एकर शेती असून पत्नी, मुले व बराच मोठा आप्त परिवार आहे. किशोर वडतकार, दिलीप बोचे, राजुरा येथील पोलीस पाटील अरविंद वाघमारे, संजय कासदे, पंकज डोहळे यांनी शेतकर्‍यांना ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यासाठी सहकार्य केले.

Web Title: Death of a farmer due to power failure; One injured