विजेचा शॉक लागून शेतकर्याचा मृत्यू
By Admin | Updated: May 12, 2017 19:32 IST2017-05-12T19:32:50+5:302017-05-12T19:32:50+5:30
रामखेड येथील शेतकरी मनोहर किसनराव फुके (३८) यांचा शेतात भुईमुगास पाणी देत असताना विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला.

विजेचा शॉक लागून शेतकर्याचा मृत्यू
ब्रम्ही खुर्द : मूर्तिजापूर तालुक्यातील रामखेड येथील शेतकरी मनोहर किसनराव फुके (३८) यांचा शेतात भुईमुगास पाणी देत असताना विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी पाच वाजताच्या दरम्यान घडली.
दिवसभर वीज भारनियमन असल्याने शेतकरी पिकास रात्रीचे पाणी देतात. मनोहर किसनराव फुके यांनी विहिरीचे खोलीकरण केले आहे. भुईमूग पिकास पाणी देता यावे, यासाठी त्यांनी रात्रभर केलेली इलेक्ट्रिक मोटार बंद करण्यासाठी स्टार्टरला हात लावताच त्यांना जबर शॉक लागला. यामध्ये त्यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. मूर्तिजापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, तपास करीत आहेत. (वार्ताहर)