थोरल्या भावाच्या अस्थी विसर्जन कार्यक्रमात धाकट्याचा मृत्यू

By Admin | Updated: September 24, 2015 23:51 IST2015-09-24T23:51:32+5:302015-09-24T23:51:32+5:30

बाश्रीटाकळी येथील घटना.

The death of the elder brother of the elder brother in the immunization program | थोरल्या भावाच्या अस्थी विसर्जन कार्यक्रमात धाकट्याचा मृत्यू

थोरल्या भावाच्या अस्थी विसर्जन कार्यक्रमात धाकट्याचा मृत्यू

सायखेड (अकोला): मोठय़ा भावाच्या अस्थी विसर्जनासाठी अमरावती येथून आलेल्या लहान भावाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २३ सप्टेंबर रोजी बाश्रीटाकळी येथे घडली. बाश्रीटाकळी येथील मधुकर नामदेव राऊत १९ सप्टेंबर रोजी दीर्घ आजाराने मृत्यू झाला. २३ सप्टेंबर रोजी त्यांच्या अस्थी विसर्जन करण्यासाठी अमरावती येथील त्यांचे लहान भाऊ सुधाकर नामदेव राऊत हे बाश्रीटाकळी येथे आले होते. सकाळी अस्थी विसर्जनासाठी आप्तेष्ट जमले होते. त्यावेळी सुधाकर राऊत यांना अचानक हृदयविकाराचा धक्का आला. त्यांना तातडीने अकोला येथे खासगी रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Web Title: The death of the elder brother of the elder brother in the immunization program