उमरीत दिवा पडून जळल्याने मुलीचा मृत्यू
By Admin | Updated: October 25, 2014 01:11 IST2014-10-25T00:55:17+5:302014-10-25T01:11:57+5:30
मोठय़ा उमरीपरिसरातील घटना.

उमरीत दिवा पडून जळल्याने मुलीचा मृत्यू
अकोला : मोठय़ा उमरीतील महाकालीनगर येथील एक १४ वर्षीय मुलगी २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी आपल्या घराच्या आवारात दिवे लावत असताना तिच्या अंगावर दिवा पडला. यामध्ये ७७ टक्के जळाल्याने तिच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना तिचा शुक्रवारी मृत्यू झाला.
मोठय़ा उमरीतील महाकालीनगर येथील रहिवासी श्रद्धा पटेल ही २१ ऑक्टोबर रोजी आपल्या घराच्या परिसरात दिव्यांची रोषणाई करीत असतानाच त्यामधील एक दिवा तिच्या अंगावर पडला. यामध्ये तिच्या अंगावरील ड्रेसने पेट घेतला व ती ७७ टक्के जळाली.
शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असतानाच शुक्रवारी तिच्या आयुष्याची प्राणज्योत मावळली. घराच्या आवारात रोषणाई करीत असतानाच तिच्या आयुष्याचा शेवट केला असून, या घटनेने तिच्या आई-वडिलांनाही अंधाराच्या खाईत लोटले.दिवाळीच्या दिवशी ही दु:खदायी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती.