अज्ञात आजाराने दाम्पत्याचा मृत्यू

By Admin | Updated: September 30, 2015 00:42 IST2015-09-30T00:42:10+5:302015-09-30T00:42:10+5:30

मूर्तिजापूर तालुक्यातील कुरूम येथील वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू.

Death of a couple with an unknown illness | अज्ञात आजाराने दाम्पत्याचा मृत्यू

अज्ञात आजाराने दाम्पत्याचा मृत्यू

कुरूम (जिल्हा अकोला) : मूर्तिजापूर तालुक्यातील कुरूम येथील वृद्ध दाम्पत्याचा सोमवारी मृत्यू झाला. दाम्पत्याची विवाहित मुलगी आजारी असून, तिच्यावर कुरूम येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुरूम येथील टाकोणकारपुरा रहिवासी शेतमजूर रामकृष्ण काशिराम पवार (६८) त्यांची पत्नी पंचफुला पवार (६५) व त्यांची विवाहित मुलगी ललिता गजानन सोळंके (३५) यांनी रविवारी रात्रीचे जेवण केले. त्यानंतर रात्री १ वाजताच्या दरम्यान त्यांना पोट दुखणे, उलट्यांचा त्रास झाला. सोमवारला पहाटे ४ वाजता प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले; मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने पुढील उपचारासाठी दाम्पत्याला सकाळी अमरावती येथे हलविण्यात आले; मात्र रामकृष्ण पवार यांचा दुपारी तर रात्री पंचफुला यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्‍चात १ मुलगा व ७ मुली असा परिवार आहे.

Web Title: Death of a couple with an unknown illness