पाळण्याच्या दोरामध्ये अडकून मुलाचा मृत्यू

By Admin | Updated: October 14, 2016 02:10 IST2016-10-14T02:10:39+5:302016-10-14T02:10:39+5:30

अकोला जिल्ह्यातील घटना.

The death of the child stuck in a cage | पाळण्याच्या दोरामध्ये अडकून मुलाचा मृत्यू

पाळण्याच्या दोरामध्ये अडकून मुलाचा मृत्यू

विझोरा, दि. १३- घरात कोणीच नसताना झोक्यावर खेळणे एका ११ वर्षीय मुलाच्या जीवावर बेतले. ही घटना गुरुवारी सकाळी ८:३0 वाजताच्या दरम्यान गोरव्हा येथे घडली.
गणेश किसन राठोड हा अकरा वर्षीय बालक घरामध्ये कोणी नसताना झोक्यामध्ये खेळण्यात रमला. झोक्याच्या दोराला आळ्या मारून झोक्यावर खेळत असताना त्यात त्याचा गळा आवळला गेला. त्यामुळे,तो जागेवरच गतप्राण झाला. सदर बाब घरातील मंडळीच्या लक्षात येताच त्याला तत्काळ जिल्हा सवरेपचार रुग्णालयात नेले.मात्र, तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गणेश हा वर्ग चवथ्या वर्गात होता.

Web Title: The death of the child stuck in a cage